
Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…
पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचे अपहरण करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. एका युवतीसोबत फोनवर संपर्कात असण्यावरून निर्माण झालेल्या वादातून आणि रागाच्या भरात मैत्रिणीच्या प्रियकरानेच हे अपहरण केल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
प्रसाद सूर्यवंशी असे सुखरूप सुटका करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रसाद हा पुण्यातील प्रसिद्ध चिमण्या मारुती चौक परिसरात उभा होता. त्यावेळी अचानक तिथे एका चारचाकी गाडीतून आरोपी आले. “तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” असा जाब विचारत आरोपींनी प्रसादला मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाय, त्याला बळजबरीने गाडीत कोंबून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
View this post on Instagram
पुण्यात MPSC ची तयारी करणारी एक युवती आणि अपहरण झालेला विद्यार्थी प्रसाद सूर्यवंशी आणि मुख्य आरोपी या दोघांशीही फोनवरून सतत बोलत होती. ही गोष्ट आरोपीच्या लक्षात आल्यावर त्याला राग आला होता. आपल्या मैत्रिणीचे दुसऱ्या मुलाशी बोलणे सहन न झाल्याने आरोपीने स्वतःच्या मित्राला सोबत घेतले आणि थेट पुण्यात येत प्रसादचे अपहरण करण्याचा कट रचला.
दरम्यान, चिमण्या मारुती चौकातून मध्यरात्री युवकाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पथकाने कारवाई सुरू केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गाडीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी गाडी घेऊन सिंहगड रोड परिसराच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्परतेने सिंहगड रोड परिसरात सापळा रचून गाडी अडवली आणि प्रसाद सूर्यवंशी याची सुखरूप सुटका केली.
View this post on Instagram
कारवाईदरम्यान विश्रामबाग पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे, तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर दोन फरार साथीदारांचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. विश्रामबाग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका विद्यार्थ्याचा जीव वाचला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.
पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…
पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…
पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…
पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन; शेवटच्या नोटमध्ये लिहिलं…

