भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…

नाशिक: मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २६) घडली आहे. अंकाईजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला झाला. अपघातातील सर्व प्रवासी हे नाशिकमधील गंगापूर या ठिकाणचे आहेत. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

कोल्हापुरात ट्रॅव्हल्स उलटून पुण्यातील, एकाच कुटुंबातील तिघे ठार पुणे: गोव्याहून मुंबईकडे भरधाव वेगात निघालेली खासगी ट्रव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री दोनच्या सुमारास कोल्हापूर-राधानगरी रोडवर पिरवाडी गावच्या हद्दीत पुईखडी वळणावर हा अपघात झाला आहे. आई नीलू विराट गौतम (वय 46), मुलगी रिद्धिमा गौतम (वय 17) आणि […]

अधिक वाचा...

पुणे शहरात एसटी बसची दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक…

पुणे : पुणे शहरातील फातीमानगर भागात एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एसटी बसचालकला ताब्यात घेतले आहे. एसटी बस सांगोला येथून स्वारगेट एसटी स्टँडकडे येत होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक […]

अधिक वाचा...

Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…

पुणे : पिरंगुट (ता. मुळशी) घाटात भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक देत अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कोलाड-पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात भीषण अपघात झाला आहे. तीव्र उतारावर एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने अनेक वाहनांना उडविले. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; युवक ठार, तिघे गंभीर…

वाशिम : समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. ११) मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या कारंजा टोलनाक्याजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त पुण्याहून वर्ध्याला गावी ४ युवक निघाले होते. समृद्धी महामार्गावरून जात असताना वाशिमच्या कारंजा टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या […]

अधिक वाचा...

भिक्षुकाचा अपघाती मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव रोडवर सायकलस्वार भिक्षुकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात दीपक मोरे हा भिक्षुक गंभीरित्या जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे असलेल्या गोधडीत लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला भिक्षुकाची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जाऊन तपासणी केली. त्याची सायकल, एक गोधडी आणि पिशवी आढळून आली. या […]

अधिक वाचा...

ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; तिघे होरपळले, चौघांचा मृत्यू…

नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राम येथे विलासपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. १०) रात्री एका ट्रकने पिकअप आणि कारला जोरात धडक दिली. या धडकेत पिकअपमधील एकाचा तर कारमधील तिघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर […]

अधिक वाचा...

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

पुणे : पुणे बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर […]

अधिक वाचा...

मुंबईत वरळी सी लिंकवर 6 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू…

मुंबई: वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीने जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात इनोव्हा कार जात होती. इनोव्हा कारमधून सहा प्रवासी प्रवास […]

अधिक वाचा...

मुंबई-पुणे मार्गावरील पुलावरून मोटार पडली रेल्वेवर; तिघांचा मृत्यू…

मुंबई : मुंबई-पुणे चौपदरी मार्गावरून जाणारी एक मोटार पुलावरुन खाली पडली आणि पुलाखालून जाणाऱ्या मालगाडीवर आदळली. यावेळी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान गाडी मुंबई-पनवेल चौपदरी मार्गावरून नेरळकडे जात असताना ही घटना घडली. धर्मानंद गायकवाड (वय 41) आणि त्यांचे चुलत भाऊ मंगेश जाधव (वय […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!