हृदयद्रावक! दोन वाहनांच्या मध्ये चेंगरूण ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): ढंपर मागेपुढे करत असताना दोन वाहनांच्या मध्ये चेंगरूण ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील निखिल संभाजी पडवळ यांच्या आशीर्वाद खडी क्रशर प्लांटवर लोडर व डंपर या दोन वाहनांच्या मध्ये दबल्यामुळे आत्माराम कुंडलिक खिलारी (वय 58 रा. शिरोली ता. जुन्नर जि. पुणे) यांच्या पोट व पाठीला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

अमोल आत्माराम खिलारी (वय 30, रा. शिरोली तर्फे आळे ता. जुन्नर जि. पुणे) यांनी पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे वडील हे लोडर टॅंक चे झाकण बसवत असताना महेश प्रकाश पाटील (रा. पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) हे त्यांच्या ताब्यातील ढंपर नंबर एम एच 16CC6899 हे मागेपुढे करत होते. लोडर ऑपरेटर काळुराम पोखरकर याने डंपर ड्रायव्हर यांना मागे पुढे घेण्यास सांगण्यास आवश्यक असताना हयगय केल्याने डंपर लोडरला धडकला. दोन्ही गाड्यांमध्ये चेंगरल्याने आत्माराम कुंडलिक खिलारी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत डंपर चालक महेश प्रकाश पाटील व लोडर ऑपरेटर काळुराम पोखरकर हे जबाबदार आहेत. सदर दोन्ही व्यक्तींवर पारगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लोकरे सदर गुन्हाचा तपास करत आहेत.

थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…

पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…

लोणीत घरफोडी केलेल्या गुन्हेगारास सातारा पोलिसांनी केली अटक…

बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!