भरधाव कारने चौघांना चिरडले विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू अन्…
जळगाव : भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडल्याची घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे गुरुवारी (ता. ४) सायंकाळी घडली. अपघातानंतर कार पलटी झाली. या अपघातात एका विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पाचोऱ्याकडून भरधाव वेगात कार जळगावच्या दिशेने जात होती. तेव्हा गोराडखेडा […]
अधिक वाचा...नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…
रांची (झारखंड) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या आदित्यपूरच्या ६ मित्रांच्या वाहनाला आज (सोमवार) सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, सहा मित्रांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिष्टुपुरच्या सर्किट हाऊस एरियातील साइ मंदिर सर्कलजवळ अपघात झाला आहे. इंडिगो कारमधून ८ मित्र जात असताना मोटार खांबाला धडकली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच […]
अधिक वाचा...अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…
अहमदनगर: अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अहमदनगर दौंड महामार्गावर आज (रविवार) सकाळी ११ वाजता ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी […]
अधिक वाचा...ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…
रायगडः माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून, 55 जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव येथून बचाव पथके, रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. […]
अधिक वाचा...बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश): गुना येथे बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण धडकेनंतर बस उलटली आणि आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. २५ जण बसची काच तोडून बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. अपघातग्रस्त बस बुधवारी (ता. २७) रात्री साडे आठच्या सुमारास […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये झाली झिंगाट पार्टी अन् पुढे…
जयपूर (राजस्थान): एका हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी चार मित्रमैत्रिणींमध्ये झिंगाट पार्टी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमधून निघाले असताना वाटेत त्यांचे भांडण झाले. एका मित्राने एक युवती आणि तिच्या मित्राच्या अंगावर कार घातली. यामध्ये युवतीचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील जवाहर सर्कल ठाणे परिसरातील गिरधर मार्गावर ही घटना घडली […]
अधिक वाचा...साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…
वाशीम : शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन चंद्रपूरला जाणाऱ्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. सर्व जखमी हे चंद्रपूरचे रहिवासी आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ मंगळवारी (ता. २६) हा अपघात घडला. चंद्रपूरचे एक कुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन […]
अधिक वाचा...अभिनेता अजय देवगण अपघातात जखमी…
मुंबई : अभिनेता अजय देवगण सिंघम 3 च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करताना जखमी झाला आहे. अजय देवगण याच्या डोळ्याला दुखापत झाली असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे सिंघम 3 चे शूट रद्द करण्यात आले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण सगळे अॅक्शन सीन स्वतः करतो. त्याला त्यासाठी बॉडी डबल वापरणे […]
अधिक वाचा...बार्शी-धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात; युवकाचा जागीच मृत्यू…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस होत असलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव येथून स्कुटीवरून बार्शीच्या येणाऱ्या युवकांची ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक जखमी झाला आहे. […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…
नाशिक : देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुंदन सोनोने या अधिकाऱ्याचा गुरुवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुंदन सोनोने हे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्तव्य बजावून घरी जात असताना वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या टेम्पोचा सोनोने […]
अधिक वाचा...
