
महाराष्ट्र हादरला! संस्थाचालकाने फी साठी घेतला विद्यार्थिनीच्या वडिलांचा जीव…
परभणी: एका विद्यार्थिनीचे पालक आपल्या मुलीचा दाखला काढण्यासाठी शाळेत गेले असताना उर्वरित फी साठी संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संस्थाचालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण.
परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता. पण, तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलीने पालकांकडे लावला होता. त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे आपल्या मुलीचा दाखला काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले होते. संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांना हेंडगे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले. यावेळी चव्हाण यांनीही हेंडगे यांना तुम्हीच उर्वरित फी द्या अशी मागणी केली. यातूनच वाद झाला अन् संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेंडगे यांना बेदम मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
जगन्नाथ हेंडगे यांना परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचे शवविच्छेदन करुन त्यांच्यावर उखळद गावात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान विनाकारण बेदम मारहाण करुन जीव घेणाऱ्या मुजोर संस्थाचालकावर कडक कारवाई करण्यात यावी आणि संस्थाही बंद करण्यात यावी, अशी मागणी जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
दरम्यान, जगन्नाथ हेंडगे यांना केवळ 3 एकर जमीन आहे. वारकरी संप्रदायाचा झेंडा हाथी घेवून सर्वत्र कीर्तन प्रवचन करत होते. त्यामुळे त्यांना महाराजही बोलले जायचे. त्यांना 2 मुली आणि एक मुलगा आहे. जगन्नाथ हेंडगे यांचा केवळ फिसाठी अशा पद्धतीने जीव घेण्यात आला आहे. यातील दोषी संस्थाचालकाला सरकारने सोडू नये, कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी ही केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…
जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास…
हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…
मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…
शिक्षकाने केलेला अपमान विद्यार्थ्याच्या लागला जिव्हारी; चिठ्ठीत लिहिले की…

