
बीड! भाजप कार्यकर्त्याचा खून केला आणि आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला…
बीड : माजलगावच्या भाजप कार्यकर्त्याची आज (बुधवार) भर दुपारी बाजारात हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे ते सदस्य होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनानंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. माजलगावमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातही पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आरोपीने खून करून थेट पोलिस स्टेशन गाठले. मीच बाबासाहेब आगे यांचा खून केला, अशी कबुली आरोपी नारायण फफाळ याने पोलिसांना दिली.
आरोपी नारायण शंकर फपाळ याने भर दिवसा बाबासाहेब आगे यांची हत्या केली. बाबासाहेब आगे हे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी आले होते. माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय आहे, तेथे दोघांमध्ये भेट होणार होती. आरोपी नारायण शंकर फपाळ याने शर्टच्या पाठीमागे कोयता लपवून आणला होता. आगे हे कार्यालयाच्या जवळ येताच त्याने कोयत्याने हल्ला चढवला. क्षणार्धात आगे रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा सगळा प्रकार आजूबाजूचे लोक पाहत होते. त्यानंतर आरोपी नारायण शंकर फफाळ याने स्वतः माजलगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आर्थिक कारणातून हत्या केली असावी, असे समोर येत आहे.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिवाय, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक दावा…
एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा
बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार
बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…
बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…
बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

