
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
पुणे : सोशल मीडियावर बनावट नावाने अकाउंट तयार करुन आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांची एवढी हिंमत वाढलीय की त्यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे नाव आणि फोटो वापरुन नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्याने पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हॉट्सएपवर स्टेटस ठेवून याविषयी माहिती दिली आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवून नागरिकांना माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटसमध्ये माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये, अशी विनंती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे.
माझ्या फोटोचा वापर करून कोणातरी पैशांची मागणी करत आहे. कोणीही याला बळी पडू नका. पैसे देऊ नका किंवा अशा कोणत्याही रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नका. आपल्या व्हॉट्सॲपला (Whatsapp) स्टेटसमध्ये अशा गोष्टींना बळी न पडण्याचे आवाहन पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना दोन वर्षांपूर्वी 1 कोटी रूपयांचा गंडा घालण्यात आला होता. 7 ते 8 सप्टेंबर 2022 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने हा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर पूनावाला यांच्या मोबाईल नंबरवरून बनावट व्हॉटसएप मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठविण्यास सांगून तब्बल 1 कोटी एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. कंपनीचे मालक आदर पूनावाला यांचा मेसेज आल्याने अधिकाऱ्यांनी कसलाही विचार न तातडीने पैसे भरले. बनावट मेसेजद्वारे आलेल्या विविध बँक खात्यावर 1 कोटी 1 लाख 1 हजार रुपये पाठवण्यात आले होते. दरम्यान, या आरोपींना बिहारमधून अटक करण्यात आली आहे.
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
‘कॉल गर्ल’च्या नावाने फोन करून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या…
भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…
पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…
सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

