
पुणे पोलिसांनी चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले परत…
पुणे (संदिप कद्रे): खडक पोलिस स्टेशन कडून नागरिकांचे चोरी व गहाळ झालेले ४,००००० रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ- ०१ मधिल नागरिकांचे सन २०२३ ते २०२४ मध्ये चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल संदर्भात खडक पोलिस स्टेशन येथे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदरील मोबाईलमध्ये महत्वाचा डाटा, डॉक्युमेंट असलेने सदरील नागरिक त्रस्त झालेले होते. खडक पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे सन २०२३ व २०२४ मध्ये पुणे शहरामधील नागरिकांचे चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल फोनचा व गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश मा. संदिपसिंह गिल्ल, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-०१,पुणे शहर यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिलेले होते. त्याप्रमाणे खडक पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे सन २०२३ व २०२४ मधिल चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल फोनचा व मोबाईल चोरांचा शोध पुणे शहरात तसेच इतर जिल्हयामध्ये तांत्रिक विष्लेषण करुन घेण्यात येत होता.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
खडक पोलिस स्टेशनकडुन सदरील चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल फोन सी. ई. आय. आर या पोर्टलमध्ये तक्रारी नोंदवुन शोध घेण्यात आला. त्या अनुषंगाने पुणे शहर तसेच इतर जिल्हयामधुन चोरीस गेलेले / गहाळ झालेले ४,००००० /- रुपये किमतीचे एकुण २५ मोबाईल फोन प्राप्त करण्यात खडक पोलिस स्टेशनला यश प्राप्त झालेले आहे. सदरील प्राप्त करण्यात आलेले २५ मोबाईल फोन दिनांक १९/०७/२०२४ रोजी खडक पोलिस स्टेशन येथे संदिपसिंह गिल्ल, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ- ०१, पुणे शहर यांचे हस्ते सदर नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी संदिपसिंह गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – ०१, पुणे शहर, मच्छिंद्र खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडक पोलिस स्टेशन, पुणे शहर, संतोष खेतमाळस, पोलिस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलिस स्टेशन, पुणे शहर, राकेश जाधव,सहायक पोलिस निरीक्षक, प्रल्हाद डोंगळे, पोलिस उप निरीक्षक, पोलिस अंमलदार / ३१८५ सागर कुडले यांनी केलेली आहे.
संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
सदरील नागरिकांना खडक पोलिस स्टेशनकडुन त्यांचे किमती मोबाईल फोन परत केले. यानतर नागरीकांनी खडक पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले आहे. खडक पोलिस स्टेशनकडुन पुणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचे मोबाईल फोन चोरी झाल्यास,गहाळ झाल्यास तात्काळ संबंधीत पोलिस स्टेशन येथे अथवा पुणे शहर पोलिस पोर्टलवर जावुन तक्रारी नोंदविण्यात याव्यात.
IAS पूजा खेडकर कुटुंबाच्या घराची पोलिसांकडून झडती; पुरावा हाती…
पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…
पुणे शहरातील युनिट ६ला फरार आरोपीला गजाआड करण्यात यश…
पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…