
‘रन फॉर डि-ऍडिक्शन ऍण्ड वुमन सेफ्टी’ या मॅरेथॉन स्पर्धेचे पुणेकरांनी केले कौतुक…
पुणे (संदीप कद्रे): ‘रन फॉर डि-ऍडिक्शन ऍण्ड वुमन सेफ्टी’ या मॅरेथॉन स्पर्धेत पुणे शहर पोलिसांसोबत नागरीकांनी सुद्धा सहभाग घेतला होता. पोलिसांनी केलेल्या आयोजन व नियोजनाचे पुणेकरांकडून कौतूक केले जात आहे.
रविवारी (ता. ६) ‘डीऍडिक्शन अँड वुमन सेफ्टी’ या कार्यक्रमाचे जनजागृती करण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालया कडून मुंढवा पोलिस हद्दीत १० km मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे पोलिस मॅरेथॉन स्पर्धा पोलिस आयुक्त रितेश कुमार व सह पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांचे सूचना व मार्गदर्शना खाली अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, पोलिस उपआयुक्त विक्रांत देशमुख, परिमंडळ – ५, पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे सहकार्य व सुचना प्रमाणे अजय देसाई यांचे ब्लू ब्रिोड रनिंग क्लब, पुणे यांनी यास्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे RJ तरुण यांनी सूत्रसंचालन केले.
सदर स्पर्धेमध्ये पोलिस व नागरिक असे मिळून ७००-७५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. हि स्पर्धा सकाळी ०७.०० वा. मंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्या मशाल रन ने सुरु झाली. सहा. पोलिस आयुक्त अश्विनी राख, हडपसर विभाग यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेस सुरूवात झाली. स्पर्धा वेस्टन हॉटेल येथे सुरू होऊन ताडीगुत्ता चौक- जहांगीर चौक- मगरपट्टा सिटी – आदित्य गार्डन पुन्हा फिरून त्याच रोडने हॉटेल वेस्टीन येथे समाप्त झाली.
स्पर्धेत विजेत्या महिला व पुरुष खेळाडूंना रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर व अश्विनी राख सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. रंजनकुमार शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धेचे कौतुक केले. तसेच महिला सुरक्षा व अंमली पदार्थ, व्यसन विरोधात उपस्थिताना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या सुरुवातीस पूजा जैन यांनी झुंबा डान्स चे प्रात्यक्षिक करून उपस्थित स्पर्धकांना स्पर्धे पूर्वीचा वॉर्म अप करून घेतला व स्पर्धकांमध्ये चैतन्य निर्माण केले. डॉ. श्रेया राजगिरे यांनी व टीम ने फिजिओ थेरपी, श्रीमती राधा कलकर्णी यांनी स्पर्धक दहा कि.मी. रनिंग नंतर खेळाडूंचे योगासने घेऊन स्ट्रेचिंग करून घेतले.
सह्याद्री हॉस्पिटल ने कार्डियाक Ambulance उपलब्ध करून दिली. अंमली पदार्थ व व्यसना विरोधात राहल जाधव यांनी मार्गदर्शन केले. लहू उघडे एव्हरेस्ट वीर तसेच श्रीमती प्रीती म्हस्के ०५ वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर यांनी आपले अनुभव कथन करून व्यायामाचे फायदे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विजय गायकवाड फिटनेस कोच यांनी देखील उपस्थितांना व्यायाम व त्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले. मॅरेथॉन हे अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडले. सदरची मॅरेथॉन स्पर्धा उत्कृष्ट रित्या पार पाडण्यासाठी अजय देसाई व त्यांच्या ब्ल्यू ब्रिोड टीम तसेच मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलिस अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक, समीर करपे, संदीप जोरे, पोलिस उपनिरीक्षक, गणेश कुलाळ, प्रमोद कोळेकर, पोलिस अंमलदार तानाजी देशमुख, निलेश पालवे, रविंद्र देवढे, शितल काळे, शुभांगी तारु, राजश्री लडकत व इतर अधिकारी अंमलदार यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सदर कार्यक्रमासाठी उपस्थितांना चहा नाश्ता याचे नियोजन करण्यात आले होते. सदर दहा किलोमीटर मॅरेथॉन ही यशस्वीरित्या पार पडली असून सर्वच खेळाडूंनी सदर स्पर्धेचे कौतक केले आहे.
सदर स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
पुरुष विभाग
१) प्रथम क्रमांक – विठ्ठल कारंडे – वेळ ४९.०८ मिनिट.
२) द्वीतीय क्रमांक – संदीप पांडूळे – वेळ ४२.५७ मिनिट.
३) तृतीय क्रमांक – सार्थक जिपाटे – वेळ ४३.०० मिनिट.
महिला विभाग
१) प्रथम क्रमांक – उपासना चौधरी – वेळ ५८.०० मिनिट.
२) द्वीतीय क्रमांक – वसंती ढमढेरे – वेळ ५९.०० मिनिट.
३) तृतीय क्रमांक – चंद्रभागा कचरे – वेळ ६०.०० मिनिट.
या स्पर्धेसाठी पुनित बालन ग्रुप, पंचशिल ग्रुप, हॉटेल वेस्टीन, सह्याद्री हॉस्पीटल यांनी विशेष सहकार्य केले आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये डीऍडिक्शन व वुमन सेफ्टी बाबत चांगल्या प्रकारे जनजागृती आली आहे. सदर पुणे शहर पोलिस दलाकडून आयोजित करण्यात आलेल्या “डीऍडिक्शन अँड वुमन सेफ्टी” मॅरेथॉन स्पर्धेचे पुणेकरांकडून कौतूक होत आहे.
‘रन फॉर दि-ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…