हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू…

सांगली : कुमठे (ता. तासगाव) गावातील एका मुलाचे दीर्घ आजाराने मुलाचे निधन झाले आणि या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे अवघ्या पाच तासांत आईनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

अविनाश महादेव पाटील (वय 54) आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील (वय 75) अशी या माय-लेकांची नावे आहेत. कुमठे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अविनाश पाटील आपल्या कुटुंबासोबत राहत होते. ते एक नामवंत पैलवान म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून अविनाश गंभीर आजाराशी झुंज देत होते. अखेर मंगळवारी पहाटे 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र शोककळा पसरली. नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सकाळी 7.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलाच्या मृत्यूचा आघात आणि त्याच्या अंत्यसंस्काराचा धक्का आई सुधाताई पाटील यांना सहन झाला नाही. मुलाच्या अंत्यविधीनंतर अवघ्या काही तासांतच, सकाळी 11.30 वाजता त्यांचीही प्राणज्योत मालवली. जे नातेवाईक आणि मित्रपरिवार अविनाशच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते, ते आपल्या घराकडे परतत असतानाच त्यांना सुगताबाई यांच्या निधनाची बातमी कळाली.

अवघ्या पाच तासांच्या अंतराने माय-लेकाचा मृत्यू झाल्याने कुमठे गावात शोककळा पसरली. अविनाश यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि सुना असा मोठा परिवार आहे.

हृदयद्रावक! पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीचाही मृत्यू…

सांगलीत खुन्नसवरून कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन जागेवरचं संपवलं…

हृदयद्रावक! आजोबांच्या मृत्यूनंतर नवविवाहित नातीचाही हृदयविकाराने मृत्यू…

हृदयद्रावक! आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं अन् बहिणीची पण सोडली साथ…

हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!