
मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत संपवलं…
नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरुच आहे. सातपूर परिसरात शनिवारी (ता. २६) खुनाची घटना उघडकीस आली आहे. मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत त्याचा खून केला. विश्वनाथ उर्फ बबलू सोनवणे (वय २७)असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या सातपूर परिसरात धारदार शस्त्राने सपासप वार करत बबलू सोनवणे या युवकाचा खून करण्यात आला आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. समशेर सिंग असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या आरोपीचे नाव आहे.
गंभीर जखमी झालेल्या बबलू याला वाचवण्यासाठी दोन मित्रांनी दुचाकीवर बसवत त्याला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगताच त्याला ते जिल्हा रुग्णालयात घेऊन तर गेले मात्र उपचारादरम्यान विश्वनाथला डॉक्टरांनी मयत घोषित केले. दरम्यान त्याच्या शरीरावर चाकूने वार दिसताच, हा अपघात वगैरे नसून खून असल्याचा पोलिसांना संशय आला आणि मित्रांकडे सखोल चौकशी करताच त्यांनी खुनाची कबुली दिली.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून एका तरुणावर प्राणघातक हल्ला कोला होता. या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. इंस्टाग्रामवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा वाद झाला होता. या वादातून टोळक्याने युवकाची हत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हत्येची आणखी एक घटना समोर आली आहे.
इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर; संदीप पाणीपुरी खात असतानाच झाला गतप्राण…
नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…
नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…
Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
भाजी विक्रेत्या युवकावर हल्लेखोरांनी दिवसा सपासप केले वार…
युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…