
सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार…
पुणेः विमानतळ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत होते.
विमानतळ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार राहूल भिमराव त्रिभुवन (वय २२ वर्षे रा. संजयपार्क झोपडपटटी न्यु एअरपोर्ट रोड, विमाननगर पुणे) यास पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे पुणे जिल्ह्यातून २५/०४/२०२३ रोजी ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे. विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील विमाननगर,कलवड, संजय पार्क भागात दहशत निर्माण करुन नागरिकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवू नये तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने आरोपीवर सहा. पोलिस आयुक्त किशोर जाधव, येरवडा विभाग पुणे विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक शांतमल कोळळुरे, पोलिस हवालदार उमेश धेंडे, महिला पोलिस अंमलदार स्वाती चौधरी यांनी दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून पाहिला होता.
आरोपीस महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणे बाबत पोलिस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला होता. शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त शशिकांत बोराटे, ना. सहा. पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन साळवे, पोलिस हवालदार उमेश धेंडे, महिला पोलिस अंमलदार स्वाती चौधरी यांनी केली आहे.