
पुणे शहरातील येरवडा पोलिसांनी दोन किलो चोवीस ग्रॅम गांजा केला जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येरवडा पोलिस स्टेशनकडून दोन किलो चोवीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती ताडीगुप्ता येरवडा परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना कळविले असता वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली ताडीगुप्ता येरवडा येथे सपोनि सुनिल सोळुंके, अमोल गायकवाड, विशाल निखल, सागर जगदाळे हे सापळा रचून थांबले होते. विठ्ठल संतोष गुमाने (वय १९ वर्षे रा कंजार भाट, येरवडा, पुणे) हा दुचाकीसह मिळून आला. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये दोन किलो चोवीस ग्रॅम गांजा मिळून आला आहे. ८४६/२०२४ एनडीपीएस कलम ८(क), २० (अ)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ४, प्रांजली सोनवणे सहा. पोलिस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वपोनि येरवडा, पल्लवी मेहेर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळुंके, पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, विशाल निलख, अमोल गायकवाड, बालाजी सोगे, स्वप्निल घोलप यांनी केली आहे.
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भर रस्त्यात कुऱ्हाडीने हल्ला…
येरवडा पोलिसांनी सराईत आरोपीकडून २ गुन्हे आणले उघडकीस अन्…
येरवडा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद…
येरवडा पोलिसांनी मोक्कातील पाहिजे आरोपीला केले जेरबंद…
दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरंबद…

