यवतमाळमधील कुख्यात गुंडास भंडारा जिल्हा कारागृहात केले स्थानबद्ध…

घाटंजी (यवतमाळ) : अवधुतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम उर्फ इसराम पवार (वय ४९, अमराईपुरा, यवतमाळ) यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सन २०१३ पासुन कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांचा गुन्हेगारी अभिलेख आहे. त्याचेवर खुन करणे, दरोडा टाकणे, घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे अवधुतवाडी पोलिस स्टेशन व लोहारा पोलिस ठाण्यात नोंद होती. अवधुतवाडी पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर ही आरोपी साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे अवधुतवाडी पोलिसांनी एमपीडीए (MPDA) चा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्फत जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केला. एमपीडीए (MPDA) चा प्रस्ताव मंजूर होतात अवधुतवाडी पोलिसांनी आरोपी साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांस अटक करुन भंडारा येथील जिल्हा कारागृहात १ वर्षासाठी स्थानबद्ध केले.

सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक नरेश रणधीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहीत चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक धैर्यशील घाडगे, पोलिस शिपाई विशाल भगत, बलराम शक्ला, रूपेश ढोबळे, मोहंमद भगतवाले, प्रतीक नेवारे आदींनी केली. या कारवाई मुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेडया…

अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात अटक वॉरंट जारी…

कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात…

हृदयद्रावक! आई रक्ताच्या थारोळ्यात अन् चिमुकला मृतदेहाला बिलगलेला…

शिरीष महाराज मोरे यांच्या चार हृदयद्रावक सुसाईड नोट आल्या समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!