पुणे शहरात भानामती करीत असल्याचे संशयावरून लाखो रुपयांची सुपारी; तिघांना अटक…

पुणे (संदिप कद्रे): भानामती करीत असल्याचे संशयावरून वयोवृध्द व्यक्तीस जिवे ठार मारण्याचा कट रचुन त्यांचे गळयावर चाकूने वार करून पसार झालेल्या अनोळखी आरोपींचा कसलाही पुरावा नसताना माग काढून जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे.

फिर्यादी यांना १५/०६/२०२४ रोजी रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे यांना पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथवर पद्मावती पुणे येथे अनोळखी व्यक्तीने चाकुने गळयावर वार करुन जखमी केल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलिस स्टेशन गु.र.नं.२१२/२०२४ भादवी कलम ३२४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयामध्ये अनोळखी आरोपीची कसलीही माहिती मिळत नव्हती. सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे व तपास पथकाचे स्टाफला योग्य त्या सुचना देवुन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांचे सुचने प्रमाणे अनोळखी आरोपीचा माग काढुन शोध घेत असताना पोलिस अंमलदार
अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे यांना बातमी मिळाली की, फिर्यादी यांना
१) सागर सतीष कुंभार वय ४१ वर्ष, रा. सी / ६ / १ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे याने चाकुने मारुन जखमी केले असुन सध्या तो त्याचे घरी आहे. लागलीच पोउनि पोठरे व तपास पथकाचे स्टाफने सागर कुंभार यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा तौरस कारले (रा. बिबवेवाडी) याचे सांगणेवरुन केला असल्याची कबुली दिली. शिवाय, त्यासाठी तौरस कारले याने ५०,०००/-रु.ची सुपारी दिल्याची कबुली दिली. सदरचा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याचे निदर्शनास आल्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सागर कुंभार याने दिलेल्या कबुलीवरुन तौरस कारले यास अप्पर डेपो येथुन ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा सागर सोनार (रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्स मागे पुणे) याचे सांगणेवरुन केला असल्याची कबुली देवुन त्यासाठी सागर सोनार याचेकडून दोन लाख (२,००,०००/-) रु.ची सुपारी घेतल्याची कबुली दिली.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

तौरस कारले याचे कबुली वरुन सागर सोनार (रा.मोरे वस्ती पद्मावती पुणे) यास ताब्यात घेवुन तपास करता त्याने त्याचे शेजारी राहणारे फिर्यादी हे करणी, भानामती सारखे प्रकार करुन त्रास देत असल्याने व आमचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याने सदरचे कृत्य केल्याचे तपासात सांगुन फिर्यादी यांना मारण्यासाठी तौरस कारले यास दोन लाख (२,००,०००/-) रु.ची सुपारी दिल्याची कबुली दिली. दाखल गुन्हयातील आरोपी
१) सागर सतीष कुंभार वय ४१ वर्ष, धंदा काही नाही रा.सी/६/१ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे
२) तौरस बाळु कारले वय ४३ वर्षे धंदा नोकरी रा. बी / ५९/१९ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे
३) सागर शशीकांत सोनार वय ३२ वर्षे धंदा नोकरी रा. मोरे वस्ती रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे यांचेकडे तपास करता त्यांनी कट कारस्थान रचुन संगनमताने सोनु होडे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असुन त्यासाठी आरोपी सागर सोनार याने फिर्यादी नामे सोनु होडे यांना जिवे मारण्यासाठी दोन लाख (२,००,००० /- ) रु.ची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात भादवि कलम ३०७,१२० ( ब ), ३४ प्रमाणे कलमवाढ केली आहे. नमुद तीनही आरोपींना दाखल गुन्हयात अटक केली असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज पोटरे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ – २, पुणे स्मार्तना पाटील सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, नंदीनी वग्यानी सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोलिस उप निरीक्षक बापु खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, विनोद जाधव, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, अमित पदमाळे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, खंडु शिंदे यांनी केली आहे.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…

पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्यांची नावे आली समोर…

पुणे शहरात घरातून निघून महिलेचा पाण्याच्या टँकरमध्ये आढळला मृतदेह…

पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!