कर्नाटकमध्ये भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश…

बेळगाव (कर्नाटक): उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुर नजीक ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाले आहेत. दुसऱ्या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांसमवेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचीही दुर्घटना घडली. कर्नाटकच्या रायपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन पलटी होऊन ही अपघाताची घटना घडली आहे. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार हम्पीच्या तिर्थयात्रेसाठी निघालेली होती. मात्र, भीषण दुर्घटनेत कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे, कर्नाटकमधील अपघाताच्या घटनेत एकूण १५ जणांचा मृ्त्यू झाला आहे.

भाजीपाला घेऊन निघालेला भरधाव ट्रक थेट 50 फूट खोल दरीत कोसळला. या घटनेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. पहाटे 5.30 च्या सूमारास ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात सूरूवात केली आहे. या अपघाताच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. कर्नाटकच्या सावनूर-हुबळी रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली आहे.

उत्तरा कन्नडचे पोलिस अधीक्षक (एसपी) एम. नारायण यांनी सांगितले की, मृत्युमुखी पडलेले सर्वजण फळ विक्रेते आहेत. ते सावनूरहून येल्लापुरा मेळ्यात फळे विकण्यासाठी जात होते. सावनूर-हुबळी रस्त्यावरील जंगलातून जात असताना हा अपघात घडला आहे. ट्रक चालकाने दुसऱ्या वाहनाला रस्ता देण्याचा प्रयत्नात ट्रक डावीकडे वळवला, परंतु जास्त वळण घेतल्यामुळे वाहन सुमारे ५० मीटर खोल दरीत कोसळले. दरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोणतीही सुरक्षा भिंत नव्हती. त्यामुळे हा अपघात घडला आहे.11 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना हुबळी येथील कर्नाटक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (KIMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिस आणि अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सर्व जखमींन दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच मृतदेहांचे पोस्टमॉर्टम सुरू झाले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

वाशिम जिल्ह्यात तीन वाहनांमध्ये भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…

भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…

हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!