मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…

मुंबई : शिक्षिका मारिया फातिमा खान (वय ३०) या गेल्या गेल्या 90 दिवसांपासून बेपत्ता असून, भोईवाडा पोलिस त्यांचा शोध घेत आहे. मारिया 18 मे रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी 21 मे रोजी भोईवाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिच्यासोबत काही अघटित तर झालं नाही ना, अशी चिंता तिच्या कुटुंबियाना सतावत आहे.

भोईवाडा पोलिस ठाण्यात 21 मे रोजी मारिया खान या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. मारिया खान यांनी गोवंडीतील एका सॉफ्टवेअर अभियंत्याशी लग्न केले आहे आणि पतीसोबत काही वैयक्तिक वाद झाल्यानंतर घर सोडले आणि बेपत्ता झाली असा कुटुंबाचा दावा आहे.

मारिया खान एका खाजगी शाळेतील प्राथमिक शिक्षिका असून, त्या एमबीए उत्तीर्ण आहेत. मारियाच्या आई नजमुनिसा खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ’17 मे 2023 रोजी मारियाच्या पतीने त्यांच्यात काही वाद झाल्यानंतर तिला आमच्या घरी सोडले. तिचा हाथ पकडून तिला घरी खेचत आणल्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला आहे. 18 मे रोजी मारिया भोईवाडा पोलिस ठाण्यात गेली असता तिचा पती अक्रमलाही बोलावण्यात आले होते. 18 मे रोजी झालेल्या बैठकीनंतर ती भोईवाडा पोलिस ठाण्यातून बाहेर आली व निघून गेली आणि घरी परतली नाही.

परदेशात काम करणारा मारियाचा भाऊ अल्तमशही तिचा शोध घेण्यासाठी मुंबईत आला असून आणि त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालावे आणि कुटुंबाला महिलेचा शोध घेण्यास मदत करावी अशी विनंती केली आहे. मारिया गायब होण्यामागे तिच्या पतीचा हात असल्याची शंका मारियाच्या कुटुंबियांना आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणानंतर भावाने कापले बोट; खासदारही अडचणीत…

धक्कादायक! भाऊजीची अन् मेहुण्याची एकाच दिवशी आत्महत्या…

Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!