
सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीचे तीन-चार महिलांसोबत अनैतिक संबंध असतानाही सुनेकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याची हत्या केल्याची घटना गाझियाबादमधील गोविंदपुरममध्ये घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेला अटक केली आहे.
पती सिंग (वय ६४, रा. कविनगर, गाझियाबाद) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पती सिंग याच्या पत्नीचे आणि मुलगा जितेंद्र यांचा 4 वर्षांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या विधवा सुनेसोबत वाद सुरू होता आणि ती न्यायालयाच्या आदेशानुसार 4 महिन्यांपूर्वी तिच्या दोन मुलांसह येथे राहायला आली होती. त्यांनी त्यांच्या घरात एका मजल्यावरील भाडेकरू देखील ठेवला होता.
आरतीचा शुक्रवारी रात्री तिच्या सासऱ्यांशी पुन्हा वाद झाला. यावर तिने मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले. सुनेने तिच्या दोन्ही मुलांना खोलीत टीव्ही पाहण्यास सांगितले. तिने टीव्हीचा आवाज वाढवला आणि मुलांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. यानंतर ती तळमजल्यावर असलेल्या तिचे सासरे पती सिंग यांच्या खोलीत पोहोचली आणि दरवाजा बंद केला. प्रथम तिच्या सासऱ्यांचे कपडे काढले आणि नंतर तिने क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. सासऱ्यांचा श्वास थांबला नाही तोपर्यंत ती मारत राहिली. सासऱ्याची हत्या केल्यानंतर पुन्हा मुलांकडे गेली.
दरम्यान, दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूने पती सिंग यांच्या खोलीतून रक्त वाहत असल्याचे पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एसीपी स्वतंत्र कुमार सिंगही घटनास्थळी पोहोचले. तेव्हा वृद्धाचा मृतदेह नग्न अवस्थेत होता. रात्री पोलिसांनी सून आरतीची चौकशी केली. सुरुवातीला ती दिशाभूल करत राहिली. तपासादरम्यान तिने सांगितले की, सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध होते. सासरा रात्री महिलांना आणत होता. त्यामुळे एखाद्या महिलेनेच खून केला असावा. जेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली, तेव्हा तिने सासरा शारिरीक सुखाची मागणी करत असल्यामुळे खून केल्याची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…
सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…
सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…
वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे…
70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…

