पत्नी आणि प्रियकराचा नको त्या अवस्थेतच पतीने केला खून…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवकाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेडरुममध्ये नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांचाही जागेवरच खून केल्याची धक्कादायक घटना दतिया जिल्ह्यात घडली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराचा खून केल्यानंतर आरोपी पती रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, वर्षभरापूर्वी पूजा वंशकर नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. पण, पूजा हिचे तिच्याच एका नातेवाईक युवकावर प्रेमसंबंध असल्याचे लक्षात आले होते. नातेवाईक असल्यामुळे तो अनेकदा घरी यायचा. अनेकदा माझ्या अनुपस्थितीत तो घरी यायचा. याबाबतची माहिती शेजाऱ्यांकडून समजली होती. बुधवारी हा नातेवाईक घराच्या जवळपास फिरताना आरोपीने बघितला होते. त्याचवेळी पूजाने मला बाजारात पाठवले. दोघांना रंगेहाथ पकडण्यासाठी बाजारात जाण्याचे नाटक केले आणि काही वेळातच पुन्हा घरी आलो. बेडरूममध्ये दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर किचनमधून कुऱ्हाड आणली आणि दोघांचा जागेवरच खून केला.
आरोपीने दिलेली माहिती ऐकून पोलिसांनी त्याला घटनास्थळी नेले. संपूर्ण खोली रक्ताने माखलेली होती. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…
नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…
चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…
नवऱ्याला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन् बसला धक्का…
दीर आणि वहिनीच्या हातात नको त्या कृत्यामुळे पडल्या बेड्या…