पुणे जिल्ह्यात पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; सात महिन्यांची चिमुकली पोरकी…

पुणेः पत्नीचा विरह सहन न झाल्याने तिच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी पतीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना इंदापूर येथे घडली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या पतीनेही आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केला आहे.

स्वप्निल सुतार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. स्वप्निल सुतार यांच्या श्रावणी या पत्नीचा दोनच दिवसांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी पतीने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन दिवसात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांची ७ महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. स्वप्निल सुतार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. पत्नीच्या अचानक मृत्यूने स्वप्निल नैराश्येत होता. या नैराश्येतूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.

स्वप्निलची पत्नी श्रावणीचा दोन दिवसाआधी डेंग्यूमुळे शुक्रवारी निधन झाले. तिच्या निधनानंतर स्वप्नील कुणाशीही बोलत नव्हता. त्याने जेवणही घेतले नव्हते. कुटूंबीयांना सांगितले की, मी थकलोय जरा आराम करतो. असे म्हणत घरातील खोलीत गेला. तो झोपला असेल म्हणून कोणीही त्याला उठवायला गेले नाही. बराच वेळ झाल्याने घरातील नातेवाईकांनी त्याला हाका मारल्या. मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. आतील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. स्वप्नीलने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, स्वप्निल व श्रावणी यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते व त्यांना ७ महिन्यांची एक मुलगी आहे. नियतीच्या या क्रूर खेळात या चिमुकलीच्या डोक्यावरील आई-वडिलांची छत्र हरपले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; मुलगा झाला पोरका…

हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…

हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…

हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!