
भांडाफोड! मद्याच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर…
पालघर : मद्य तस्करांनी दारू वाहतुकीसाठी लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्रात बंदी असलेली दारू दादरा नगर हवेलीमधून राज्यात आणण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला आहे. मात्र पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्तकतेमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे.
महाराष्ट्रात बंदी असलेल्या दादरा नगर हवेलीतल्या मद्याच्या तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. मद्याच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. रुग्णाला झोपण्यासाठी असलेल्या बॉक्समधून दहा लाख रुपयांच्या मद्याची तस्करी केली जात होती. पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर वाडा खडकोणा इथे रुग्णवाहिका ताब्यात घेतली. पळ काढलेल्या रुग्णवाहिका चालकाचा शोध सुरु आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही रुग्णवाहिका ताब्यात घेतली. मनोर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेत रुग्णाला झोपण्यासाठी असलेल्या बॉक्समध्ये हा दारूचा साठा लपवण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याची किंमत जवळपास दहा लाखांच्या घरात आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…
संतापजनक! अल्पवयीन गतीमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर…
आपल्या कर्तव्यामुळे नावारूपाला आलेले पोलिस अधिकारी अक्षय सोनवणे…
शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…
जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

