
जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर शरीराची अक्षरशः चाळण…
जळगाव: पाचोरा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी (ता. ४) मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी युवकावर गावठी कट्ट्याने तब्बल १२ राउंड फायर करत निर्घृण हत्या केली. वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत युवकाचे नाव आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे आहे. मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात आल्या की त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली.
आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तो म्हटले होते की, “शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोख ठोक. जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर काहीच तासांत हा जीवघेणा हल्ला झाल्याने ही हत्या वर्चस्ववादातून झाली का? याचाही तपास पोलीस करत आहेत.’
आकाशच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत. कपाळावर १, डोक्यावर ४, पाठीवर ४, छातीवर १, डोक्याच्या मागे २ अशा एकूण १२ गोळ्या लागल्या असून, त्याच्या शरीराची अक्षरशः चाळणी झाली होती. हत्यानंतर मारेकरी नीलेश अनिल सोनवणे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार हे दोघे जळगावच्या दिशेने दुचाकीवरून निघाले. मात्र, त्यांच्यामागे काही लोक असल्याची शंका त्यांना आल्याने ते थेट जामनेर पोलीस ठाण्याच्या दिशेने गेले. शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास ते म्हसावद-नेरी मार्गे पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले. त्यावेळी ते घाबरलेल्या अवस्थेत होते आणि पोलिस स्टेशन कुठे आहे, अशी विचारणा करत उभे होते. अखेर त्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
वाळू व्यवसायातील वाद, वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सोशल मीडियावरच्या स्टेटस, रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना यांचाही तपास पोलिस करत आहेत.
पुणे! कोंढव्यातील पिडीतेला पोलिसांनाच केला उलट प्रश्न अन् अडकली…
जळगाव! गायत्री पाटील प्रकरणाला मिळालं नवं वळण…
हॉटेलमध्ये परदेशातील युवतींकडून देह व्यापार; पोलिसांनी टाकला छापा अन्…
ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…
डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

