
बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…
बार्शी (आकाश वायचळ) : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी (ता. २१) एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.
बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन युवकांचा एसटी बस खाली चिरडून मृत्यू झाला आहे. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी मृत युवकांची नावे आहेत. तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते.
तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते. यावेळी पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस आणि दुचाकीचा तांदुळवाडी येथे भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिनही युवक एसटी बस खाली अडकले. एका युवकाचे शीर हे शरीरापासून वेगळे झालं. तर इतर दोघे जवळपास 50 फूटांपर्यंत फरफटत गेले. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला धावून आले होते. त्यांनी बसमधील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री
हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…
नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…
ट्रक आणि कारचा भीषण अपघात 6 ठार; पाहा नावे…
हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

