
शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…
पुणे: ‘माझा सरकार आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. माझा नवरा हिंदुत्ववादाचं काम करत होता म्हणून ही घटना झाली आहे. समोरच्याला वाटत असेल त्यांचं असं करून मी खचून जाईन, तर त्यांना एकच सांगणं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे. जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत हिंदुत्वासाठी लढणार,’ असे शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आज (सोमवार) म्हणाल्या आहेत.
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज स्वाती मोहोळ यांची भेट घेतली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वाती मोहोळ म्हणाल्या, ‘सरकार आणि प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल. आपला नवरा हिंदुत्ववादी होता, हिदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्याला जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार.”
दरम्यान, स्वाती मोहोळ यांनी रविवारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली. भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, ‘कोणतीही राजकीय किंवा अन्य चर्चा न करता मोहोळ कुटुंबीयांचे सांत्वन करायला आलो आहे. शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करत आहेत. मोहोळ कुटुंबीयांचे हिंदु समाजासाठी मोठं काम आहे. शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची आहे, त्या बद्दल मोहोळ कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये अशी विनंती मी करतो.”
शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात प्रवेश करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

