अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…

अमरावती : एका कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अपघातग्रस्त कार अकोल्याहून अमरावतीला निघाली होती. भातकुली गावाच्या परिसरात कारचे टायर फुटल्यानंतर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी व्यक्तींना उपचारासाठी अमरावतीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कलीम खान सलीम खान (वय 36), सलीम खान मेहमूद खान (वय 65) आणि रुबीना परविन कलीम खान (वय 32) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. रिजवान, नदीम, जारा परवीन ही तीन मुलं आणि मोहम्मद शकील हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…

भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…

अहमदनगर-कल्याण भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…

नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!