Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…

पाटणा (बिहार): दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना नालंदा जिल्ह्यात घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन महिलाच नाही तर त्यांची माहेरची मंडळीदेखील एकमेकांना भिडल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. याबाबत परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

गावातील नागरिकांसमोरच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काही जणांनी त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी एका महिलेला तिचा पती आणि मुलांसोबत पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मलामा गावातील महेंद्र पासवान यांना तीन मुलगे आहेत. सुबोध कुमार, मॅनेजर पासवान आणि हिरेंद्र. यापैकी मॅनेजर पासवानचा मृत्यू झाला आहे. तर मोठा मुलगा सुबोध कुमार जिवंत आहे. धाकटा मुलगा हिरेंद्र याचे अद्याप लग्न झालेले नाही. मॅनेजरच्या विधवा पत्नीला हिरेंद्रसोबत लग्न करायचे होते. तिला तीन मुलेही आहेत. माहेरच्यांनी हिरेंद्रसोबत लग्न ठरवून ते करण्यासाठी हिलसाचे सरकारी कार्यालय गाठले होते.

हिरेंद्र याच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याची मोठी वहिनी देखील पाठीमागे लागली होती. तिला देखील हिरेंद्रसोबत लग्न करायचे होते. यावरून दोन्ही वहिन्या एकमेकींना भिडल्या. शिवाय, दोघींचेही माहेरचे लोक देखील एकमेकांना मारहाण करू लागले. यानंतर पोलिसांनी सुबोध कुमार व त्याच्या पत्नीला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. यानंतर हिरेंद्र आणि त्याची विधवा वहिनी हेमंतीदेवी यांचे लग्न लावण्यात आले. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

भाऊ आणि वहिणीची हत्या करणारा चार तासात ताब्यात; हत्येचे कारण…

दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!