द्राक्ष बागांच्या शेतातील शेडमध्ये ड्रग्जचा कारखाना; 245 कोटींचे ड्रग्ज जप्त…

सांगली : एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 245 कोटी रूपयांचे 122 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कुपवाडमधील एमडी ड्रग्जच्या साठ्यावरील कारवाईनंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय गोपनियता राखत सदरची कारवाई केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील रहिवासी असलेला आणि सध्या पंधरा ते सतरा वर्षे मुंबई येथे वास्तव्यास असलेला मुख्य संशयित हा ड्रग्ज तस्करी करीत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे इरळी, डोर्ली, ढालेवाडी आणि ढालगांव या चार गावांच्या सिमेवर असलेल्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला.

द्राक्ष बागांच्या शेतातील शेडमध्ये निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या ड्रग्ज तयार करण्यात येणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत अड्डा उद्धवस्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने शेतमालक वासूदेव लक्ष्मण जाधव (रा. ढालेवाडी) याला ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयिताचा तपास सुरू आहे. पोलिसांनी ड्रग्ज तयार करण्याच्या कच्च्या मालासह केमिकल, मशिनरी, मिक्सर असं सर्व साहित्य जप्त करत सहा संशयित कामगारांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…

पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…

Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…

पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!