
Video: नाशिकमध्ये गुंडाचा झेरॉक्स दुकानावर तलवारीने हल्ला; युवती जागेवर बेशुद्ध…
नाशिक : नाशिक शहरात हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारा गुंड सीसीटीव्हीत कैद झाला आहे. इंदिरा नगरमधील साईबाबा मंदिर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंदिरा नगरमधील साईबाबा मंदिर परिसरात गुंडाकडून हातात तलावर घेऊन झेरॉक्स दुकानावर हल्ला करण्यात आला आहे. अचानक घडलेला हा सर्व प्रकार पाहून या दुकानात उभी असलेली एक युवती जागेवरच बेशुद्ध पडली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ‘हक या झेरॉक्स दुकानावर उभे आहेत. याचवेळी एक व्यक्ती हातात तलवार घेऊन येतो आणि तलवार झेरॉक्ट दुकानाच्या काउंटरवर जोरात आपटतो. या प्रकारानंतर तिथे उभे असलेले ग्राहक तिथून निघून जातात. मात्र, हा सर्व प्रकार पाहून दुकानात उभी असलेली युवती चक्कर येऊन बेशुद्ध पडते.’ दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये हातात तलवार घेऊन गुंडाचा झेरॉक्स दुकानावर हल्ला; युवती जागेवर बेशुद्ध…https://t.co/42LUDp6Iqz#Nashik #NashikCrime @nashikpolice pic.twitter.com/yTM6M6EOy9
— policekaka News (@policekaka) December 19, 2023
संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…
नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…
Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

