
Video: पोलिसाला हेल्मेट घालण्यास सांगितलेल्या युवकाला पोलिसाने मारली चापट…
नागपूरः नागपूरमध्ये एक पोलिस हेल्मेट शिवाय दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालण्याचा सल्ला युवकाने दिला. यावेळी संतापलेल्या पोलिसाने युवकाला चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे.
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरात एका युवकाने पोलिस कर्मचाऱ्याला हेल्मेट घालण्यास सांगितल्यानंतर राग आला की त्याने दुचाकी थांबवली आणि युवकाला चापट मारली आहे. युवकाने नागपूरच्या जरीपटका पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलीस हेल्मेटशिवाय सामान्य नागरिकांवर कारवाई करतात पण पोलीस स्वतः हेल्मेट घालत नसल्याचे युवकाने म्हटले आहे.
जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रतीक खानकुरे नावाचा युवक जरीपटका पोलीस ठाण्याजवळून जात होता. मानकापूर पुलाजवळून जात असताना, प्रतीकला आनंद सिंग नावाचा एक पोलिस हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना दिसला. पोलिसाला हेल्मेट घालण्यास सांगितले तेव्हा त्याने त्याची दुचाकी थांबवली, प्रतीककडे गेला आणि त्याला चापट मारली. यावेळी पोलिसाने त्याला जे करायचे आहे ते करायला सांगितले. संबंधित पोलिसाने आपण दंत उपचार करून परत येत असून, दातदुखी असल्याने मी हेल्मेट घातले नसल्याचे सांगत आहे.
दरम्यान, व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. पोलीसने बरोबर केलं… याने कशाला वाढीव काम करायचं, काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोलिसांच्या मागे हात धुवून लागलेले असतात. भारतातल्या सगळ्या वाईट गोष्टीला पोलिस कारणीभूत अशी यांची समज असते. बर झालं कानफाड शेकलं. दाताच्या दुखण्याने माणूस त्रस्त झालेला असतो त्यात हा व्हिडिओ काढतोय, असे किशोर खरात यांनी म्हटले आहे.
तुम्ही हेल्मेट का घातलं नाही? असं आनंद सिंह नावाच्या पोलिसाला एकाने विचारल्यावर पोलिसाने तरुणाला २ कानाखाली मारल्या… वरुन शिव्या का देतोय असा खोटा आरोप केला. दात दुखत असल्यामुळे हेल्मेट घातला नसल्याचं सांगत विचारणाऱ्या नागरिकालाच दमदाटी केली. घटना नागपूरमधली आहे. pic.twitter.com/eKVu1Y9stt
— Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) April 11, 2025
देवाला बळी देण्यासाठी जाताना अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला…
प्रसिद्ध अभिनेत्याला केली अटक; मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश…
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…
नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…
नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरलं; घरातील रॉडने हल्ला…

