भ्रष्टाचार केल्या प्रकरणी आरोपी दत्ताजी जाधव याची निर्दोष मुक्तता…

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील वासरी येथील भारत निर्माण योजनेचे ग्राम आरोग्य पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष दत्ताजी जाधव याची दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर (घाटंजी) यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. तथापि, सचिव सखुबाई कचाडे या तपासादरम्यान मरण पावले होते.

घाटंजी तालुक्यातील वासरी येथील भारत निर्माण योजनेचे ग्राम आरोग्य पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष दत्ताजी देवसिंग जाधव व सचिव सखुबाई कचाडे ह्यांनी १२ लाख ६८ हजार ६१८ रुपयाचा अपहार केल्या प्रकरणी फिर्यादी प्रियंका प्रशांत धांदे हिच्या तक्रारीवरुन आरोपी दत्ताजी जाधव, सखुबाई कचाडे यांचेविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६९ व ४७७ (अ) सह कलम ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. गुरनुले यांनी करुन घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६९ व ४७७ (अ) सह कलम ३४ प्रकरणात आरोपी दत्ताजी देवसिंग जाधव याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपी दत्ताजी जाधव याच्यातर्फे घाटंजी न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी बाजू मांडली.

स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…

भूषण गगराणी यांचा पीए असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणारा जेरबंद…

राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…

IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!