
‘तुला आम्ही खल्लासच करतो’ म्हणणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवून कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तीक मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हेगारीचे समुळ उच्च्याटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार खुनाचा कट रचणा-या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
१७/०६/२०२३ रोजी सायंकाळी ४.१० वा. चे सुमारास जयभवानी चौक, रामनगर (वारजे माळवाडी) येथील फिर्यादीचे घराचे समोर रोडवर मित्रांसह क्रिकेट खेळत असताना त्यांच्या ओळखीचे किरण गावडे, अविष्कार पवार व सोहम सातव असे तिघे एका लाल रंगाचे पल्सर २२० गाडीवरून आले होते. सोहम सातव याने फिर्यादीला जवळ बोलावून “आज तुला आम्ही खल्लासच करतो” असे म्हणून त्याचेकडील बंदुक फिर्यादीचे दिशेला रोखल्याने फिर्यादीने सदरची बंदुक हाताने वळविल्याने त्यातील गोळया जमीनीवर फायर झाल्या. त्याचवेळेस अविष्कार पवार याने त्याच्याकडील बंदुकीने फिर्यादीवर फायर केल्याने तेथील लोक सैरावैरा पळू लागले. त्यावेळी फिर्यादीवर फायर केल्याने त्यातील गोळी फिर्यादीच्या कमरेच्या पाठीमागे डाव्या बाजूस लागून फिर्यादीला जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून तक्रार फिर्यादी यांची त्यांचेविरुध्द तक्रार दिल्याने वारजे माळवाडी पो.स्टे २४३/२०२३ भा.द.वि.कलम ३०७, ३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महा. पोलिस अधिनियम कलम ३७(१) सह १३५, क्रि.लॉ. अमे.का. कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक काळे हे करीत असताना विधीसंघर्षग्रस्त बालकांकडे त्यांच्या नातेवाईकांसमोर विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा पुर्ववैमनस्यातून
१. ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते वय २३ वर्षे, रा. सनं १३५, यशोदिप सोसायटी, संघर्ष चौक, वारजे माळवाडी पुणे
२. वीर फकीरा युवराज कांबळे वय २२ वर्षे रा.प्लॅट नं २६ जिजाई अपार्टमेंट, सरडे बाग, शिवणे पुणे यांच्या सांगण्यावरून पुर्वनियोजिट कट रचून केला असल्याचे सांगितले. तपासामध्ये सदर आरोपीनी विधीसंघर्षीत बालकांचा गुन्हयामध्ये वापर करून, गुन्हा करण्याकरीता संगनमताने कट रचून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयामध्ये भा.दं.वि.क १२० (ब) व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ८३ (२) प्रमाणे कलमवाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे १. ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते वय २३ वर्षे, रा. सनं १३५, यशोदिप सोसायटी, संघर्ष चौक, वारजे माळवाडी पुणे
२. वीर फकीरा युवराज कांबळे वय २२ वर्षे रा.प्लॅट नं २६ जिजाई अपार्टमेंट, सरडे बाग, शिवणे पुणे व
३ विधि संघर्षित बालक यांनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न केले असून ०१ आरोपीला अटक करण्यात आलेली असून विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेवून पालंकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वीर फकीरा युवराज कांबळे वय २२ वर्षे रा. प्लॅट नं २६ जिजाई अपार्टमेंट, सरडे बाग, शिवणे पुणे (पाहिजे आरोपी) यास अटक करणे बाकी आहे. अटक आरोपी यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपी ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते (टोळी प्रमूख) हा प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.
दाखल गुन्हयात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, पुणे यांनी सुहेल शर्मा, पोलिस उप आयुक्त, परि-३ पुणे शहर यांचे मार्फतीने प्रविण पाटील साहेब, अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते (टोळी प्रमूख) याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते (टोळी प्रमूख) याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असून, यातील आरोपी यांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, गुन्हा करण्यासाठी कट रचणे, बेकायदेशिर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (।।), ३ (४) या कलमाचा समावेश करणे बाबत मा. श्री प्रविण पाटील साहेब, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे यांनी मंजुरी दिलेली आहे. त्याप्रमाणे वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे गु.र.नं २४३/२०२३ या गुन्हयामध्ये मोक्का कायद्याची कलमे समाविष्ट करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास भिमराव टेळे, सहा पोलिस आयुक्त, कोथरूड विभाग पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदिप कर्णीक, सहपोलिस आयुक्त पुणे शहर, प्रविण पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, सुहेल शर्मा, पोलिस उप आयुक्त परि-३, पुणे शहर, भिमराव टेळे, सहा. पोलिस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी, निगराणी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विशाल मिंडे, पोलिस अमंलदार संभाजी दराडे, पोलिस अमंलदार विजय खिलारी, पोलिस अमंलदार नितीन कातुर्डे यांनी केली आहे.
पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…
पुणे पोलिस आयुक्तांकडून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६वी कारवाई…
पुणे पोलिस आयुक्तांची दोघांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई…
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक…
पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…