मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीत वाहनांची तोडफोड करणा-या सुरज रमेश पंडीत (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर १० साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८६वी कारवाई आहे.

फिर्यादी यांना २५/१०/२०२३ रोजी गोसावी वस्ती, सुरक्षानगर रोड, हडपसर, पुणे येथे घराच्या जिन्या मध्ये येवून यश जावळे व युवराज बढे हे त्यांचे हातात धारदार लोखंडी हत्यार घेवून तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र सुरज पंडीत, समीर ऊर्फ सॅम शेख, अक्षय राऊत व इतर ४-५ अनोळखी जणांनी मोठमोठ्याने ओरडून व शिवीगाळ करुन फिर्यादी व त्यांच्या वडीलांना मारहाण करुन जबरदस्तीने एकुण ३०,००० रुपये किंमतीचे सोन्याची अंगठी व रोख रक्कम घेतले. यानंतर सार्वजनिक रोडवर येवून हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवून ‘आमचा नाद कोणी करायचा नाही; आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण केली व सार्वजनिक रोडच्या कडेला पार्क केलेल्या एकूण २२ वाहनांची तोडफोड करून आर्थिक नुकसान केले आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १६३१ / २०२३, भा.दं.वि. कलम ३९५,३२३, ४२७, ५०६, ५०४, आर्म अॅक्ट कलम ४(२५), क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ३,७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम
३७(१)(३)१३५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील निष्पन्न आरोपी
१) सुरज रमेश पंडीत, वय २९ वर्षे, रा. निलेश क्लासिक सोसायटी, ए विंग, फ्लॉट २१, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख)
२) यश प्रदिप जावळे, वय २३ वर्षे, रा. श्रीराम चौक, गुलाम अलीनगर, सातवनगर रोड, हडपसर, पुणे
३) युवराज प्रकाश बढे, वय २३ वर्षे रा. साई कॉलनी, वाडकरमळा, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे आ.क्र.१ ते ०३ यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
४) अक्षय राऊत, रा. सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, पुणे
५) समीर बागवान, रा.वाडकर मळा, महंमदवाडी रोड, पुणे
६) शिवा कानगुले रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड, पुणे (टोळी सदस्य) इतर ४ ते ५ अनोळखी जण हे पाहिजे आरोपी आहेत.

गुन्हयाचे तपासा मध्ये सदर आरोपी सुरज रमेश पंडीत (टोळी प्रमुख) याने गुन्हेगारी टोळी तयार केली असून ते सर्व हडपसर, काळे पडळ, गोसावीवस्ती, हांडेवाडी रोड, या भागात त्यांचे टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी संघटीत गुन्हे करीत असले बाबत तपासामध्ये निदर्शनास आले आहे. तसेच ते व त्यांचे इतर साथीदार मिळून परिसरातून कोयते हत्यारे दाखवून खंडणी स्वरुपात पैसे उकळतात. छोटे व्यवसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन त्यांचे मनामध्ये दहशत निर्माण करून त्यांचेकडून हप्ता घेतात. त्यांचे दहशतीमुळे नागरीकांचे मनात भिती निर्माण झालेली असून त्यांचे विरुध्द कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने सदरील टोळीचे वर्चस्व हडपसर परीसरात वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच त्यांच्या विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण मधील वेग-वेगळया पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील ०२ आरोपी हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेविरूध्द यापुर्वी घातक शस्त्राने जिवे ठार मारणे, जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खंडणी गोळा करणे, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा प्रकारे स्वतःस व टोळीचे सदस्यास अवैध मार्गाने आर्थिक लाभ व इतर फायदा व्हावा या उददेशाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार संघटितपणे करीत आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

प्रस्तुत गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२).३(४) चा अंतर्भाव करणेकामी हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी पोलिस उप-आयुक्त, परीमंडळ – ०५, पुणे शहर, विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करून हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १६३१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९५, ३२३, ४२७, ५०६, ५०४,आर्म अॅक्ट कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अॅमेंटमेंट अॅक्ट कलम ३.७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii).३(२).३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे, अश्विनी राख या करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त पुणे संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त परीमंडळ – ५, पुणे शहर, विक्रांत देशमुख, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर अश्विनी राख त्यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर, रविंद्र शेळके, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), विश्वास डगळे, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), संदिप शिवले, सहा. पोलिस निरीक्षक, सारिका जगताप, पोलिस उप-निरीक्षक महेश कवळे, निगराणी पथकातील पोलिस अंमलदार, प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, हनुमंत झगडे यांनी कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली ही ८६ वी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!