खुलेआम रेतीची तस्करी करणाऱ्या तीन ट्रकवर पोलिसांची कारवाई…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सावळी (सदोबा) परिसरात मागील अनेक दिवसांपासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू होती. पोलिसांनी कारवाई करून तीन ट्रक ताब्यात घेतले आहेत.

सावळी (सदोबा) परिसरातून अवैध मार्गाने रेतीची वाहतूक यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, वाशिम व इतर ठिकाणी केल्या जात होती. या बाबतची गोपनीय माहिती पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांना प्राप्त झाली. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या तीन टिप्परवर शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सावळी (सदोबा) दुरक्षेत्र अंतर्गत पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत सावळी (सदोबा) ते चिखलवर्धा मार्गावर अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या MH-29 BE 5198, MH-29 BE 1219, MH-29 BE 3035 क्रमांकाचे तीन टिप्पर जप्त करुन वाहनासह 34 लाख 12 हजार रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली. सदर टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले असून टिप्पर चालक व गाडी मालकांविरुद्ध भादंवि कलम 379, 109 अंतर्गत पारवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अवैध रेती तस्करांनी महसूल विभाग, पोलिस विभाग व वनविभागाच्या नाकावर टिचून रेतीची खुलेआम तस्करी करुन वाहतूक करण्यात येत होती. सावळी (सदोबा) परिसरातील रेती तस्करांवर सर्वात मोठी कारवाई म्हणून या कारवाईकडे पाहिल्या जात आहे.

सदरची कारवाई पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नितिन सुशिर, पोलिस उप निरीक्षक संदीप बारिंगे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात पार पडली. पारवा पोलिस पुढील तपास करीत आहे.

यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…

यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…

यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…

घाटंजी येथे फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!