
यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (सदोबा) ते उमरी मार्गाने मोटार सायकल क्रमांक MH 29 S 2604 ने आयता येथे जात असताना खरात यांच्या शेताजवळ आरोपी भिमराव नामदेव धुर्वे (वय 30) याने मोटार सायकल भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने चालवून धडक दिल्याने अनिल आडे याचा मृत्यू झाला आहे.
फिर्यादी वडील मारु यशवंत आडे (वय 65, रा. आयता ता. आर्णी) यांच्या तक्रारीवरुन आरोपी भिमराव नामदेव धुर्वे (वय 30, रा. सावळी (सदोबा) विरुद्ध भादंवि कलम 304 (अ), 279, 338 सह कलम 134 (अ), 184, 187 मोटार वाहन कायदा अंतर्गत पारवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संदीप बारींगे पुढील तपास करीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारु आडे याचा मुलगा अनिल मारु आडे (वय 42) हा मोटार सायकल क्रमांक MH 29 S 2604 दुचाकी वाहनाने सावळी (सदोबा) वरुन आयता येथे जात असतांना सावळी (सदोबा) ते उमरी रस्त्यावरील खरात यांच्या शेताजवळ उमरी कडुन मोटार सायकलने येणारा भिमराव धुर्वे (वय 30) रा. सावळी (सदोबा) ता. आर्णी याने त्याची मोटार सायकल क्रमांक MH 29 BM 4907 भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने चालवुन मोटार सायकलचा अपघात घडवला. या अपघातात अनिल धुर्वे याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणात पारवा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक संदीप बारींगे हे पुढील तपास करीत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…
धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…
आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे; असे म्हणून शासकीय कामात अडथळा…
सरपंचाने केला शौचालयास गेलेल्या महिलेचा विनयभंग…
घाटंजी पोलिसांची मुर्ली येथील जुगार अड्डयावर धाड; आरोपींमध्ये शिक्षक…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

