घाटंजी येथे फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयात लोक अदालतीत 604 पैकी 169 प्रकरणे निकाली काढण्यात आले. तर खावटी, चेक बाऊन्स, मोटार वाहन व इतर प्रकरणात 8 लाख 21 हजार 594 दंड म्हणून वसुल करण्यात आला. या वेळी न्यायालय क्रमांक 1 दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात, न्यायालय क्रमांक 2 दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर आदीं उपस्थित होते.

लोक अदालतीत प्रकरणात न्यायालयाच्या बाहेर 2270 प्रकरणापैकी 286 प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात बॅकेची कर्ज वसुली, विद्युत बिल, ग्रामपंचायत थकबाकी कर इत्यादी 19 लाख 39 हजार 498 रुपये दंड म्हणून वसुल करण्यात आले. घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयात एकुण 2874 प्रकरणापैकी 455 केसेस निकाली काढण्यात आले असून 27 लाख 61 हजार 92 रुपये दंड म्हणून वसुल करण्यात आला आहे.

या वेळी घाटंजी न्यायालयातील विधिज्ञ, घाटंजी व पारवा पोलीस स्टेशनचे कोर्ट मोहरर, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, न्यायालयीन अधिक्षक बी. पी. बागडे, स्टेनो अफसर अली, वरिष्ठ लिपिक रवि बुटले, वरिष्ठ लिपिक योगीता दरणे, राहुल बनारसे, कनिष्ठ लिपिक रुषीकांत खडसे, पवन राठोड, विश्वास चेडे, सौ. भगत, शिपाई लखन आडे, शिपाई मोनाली भवरे, शिपाई संतोष आकोलकर, शिपाई सौ. देशपांडे आदी न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

घाटंजी येथे विधी सेवा समितीतर्फे विधी साक्षरता शिबिर संपन्न…

घाटंजी पोलिसांची मुर्ली येथील जुगार अड्डयावर धाड; आरोपींमध्ये शिक्षक…

यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…

आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे; असे म्हणून शासकीय कामात अडथळा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!