हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाहानंतर नवदाम्पत्य हनिमूनला कुठे जायचे याचे नियोजन करत असतानाच पोलिसांनी नवरीला ताब्यात घेतले आणि तिची रवानगी कारागृहात केली. आग्रा जिल्ह्यातील ट्रान्स यमुना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली आहे.
नवरीने यापूर्वी एकासोबत विवाह करून पळून आली होती. दुसरा विवाह केल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली आणि घटना उघडकीस आली. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. ट्रान्स यमुना पोलिस ठाण्याचे प्रभारी सुमनेश विकल यांनी सांगितले की, ‘नगला रामबल येथील रहिवासी असलेल्या अनिलकुमार यांचा 18 डिसेंबरला मंदिरात विवाह झाला. अनिलचा विवाह परिचित असलेले राजेशकुमार दोहरे यांनी जमवला होता. सुनीलने अनिलकुमारची प्रदीप नावाच्या तरुणाशी भेट घडवली. त्याने अनिलकुमारला माही उर्फ रजनीशी गाठ घालून दिली. प्रदीपने अनिलकुमारला सांगितले, की रजनी गरीब कुटुंबातली असून, विवाहाचा पूर्ण खर्च अनिललाच उचलावा लागेल. त्यावर अनिलने सहमती दर्शवली आणि 70 हजार रुपये दिले होते.’
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने आजारी पडण्याचे नाटक केले आणि औषध आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतलीच नाही. आरोपी नववधू मूळची मुरादाबाद जिल्ह्यातल्या कटघरची रहिवासी असून, तिने पैशांसाठी हे लग्न केले होते, असं तिने चौकशीवेळी सांगितले. आरोपी नववधूला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर तिला तुरुंगात पाठवण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून, टोळीतल्या अन्य आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…
हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…
हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…
हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…
हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!