Video: खासदार अमोल कोल्हे यांनी बजावली वाहतूक पोलिसाची भूमिका…
पुणे: मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा चौकात खासदार अमोल कोल्हे वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सुरळीत केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मुंबईवरुन परत येत होते. मुंबईवरून आपल्या मतदार संघात जात असताना सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडीत ते अडकले. त्यानंतर सोमाटणे फाटा चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहतूक पोलिसांची भूमिका बजावत वाहतूक सुरुळीत केली. काही वेळेत त्यांनी वाहतूक सुरुळीत केली. त्यानंतर ते पुढील मार्गावर रवाना झाले.
दरम्यान, दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक जण गावी गेले होते ते आता परतू लागले आहेत. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी दिसत आहे.
खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उचलले पाऊल#Amolkolhe #Pune pic.twitter.com/wJJlqPFNrL
— jitendra (@jitendrazavar) November 19, 2023
वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…
वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!