मुंबईत कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू; अखेर सत्य आलं समोर…

मुंबई : दक्षिण मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यूने खळबळ उडाली होती. चिकन बिर्याणी आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्ल्याने विषबाधा झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अखेर 11 दिवसांनी मृत्यूचे कारण समोर आले असून, उंदीर मारण्याच्या औषधाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूसाठी कलिंगडातील भेसळ कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नव्या अहवालाने या प्रकरणाला एक वेगळे वळण दिले आहे. अखेर या चौघांच्या शरीरात झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहे. अनैसर्गिक हा मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या आहे की घातपात आहे याचा तपास पोलीसांकडून सुरू करण्यात आला आहे. सामूहिक आत्महत्या असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

कलिंगड तपासणी केल्यानंतर त्यात भेसळ आढळली नव्हती. त्या चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट आढळले आहे. याचा वापर उंदीर मारण्यासाठी केला जातो. कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारले आहे? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, मृतांचे महत्वाचे अवयव हिरवट पडल्याचे प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीत समोर आले आहे. मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबातील सर्वांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेतल्यावर त्यांना काही काळ बरे वाटले. मात्र, त्यानंतर प्रकृती पुन्हा खालावली आणि चौघांचा मृत्यू झाला होता.

मुंबई! कलिंगड खाऊन 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट…

बिर्याणीनंतर रात्री कलिंगड खाल्लं अन् कुटुंबातील चौघांचा मृत्यू…

सोलापूर हादरलं! दिराने मधरात्री घरात घुसून वहिनीसह 2 पुतण्यांना तलवारीनं भोसकलं…

संतापजनक! पुणे जिल्ह्यात मार्कशीटवर खाडाखोड केल्याने मुलीला क्रूरपणे संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!