
पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसकाकाचा मृत्यू…
चंदीगड (पंजाब): पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या एका पोलिसकाकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिरालाल (वय ५२) असे मृत्युमुखी पडेलेल्या पोलिसकाकाचे नाव असून, ते पटियाला येथे पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते.
शंभू बॉर्डरवर बंदोबस्तावर तैनात असताना हिरालाल यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना तातडीने अंबाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर म्हणाले, ‘हिरालाल यांनी आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक बजावले आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे. शंभू बॉर्डरवर एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला तेव्हाच हिरालाल यांचा देखील मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.’
दरम्यान, शंभू बॉर्डरवर मित्रांसोबत ट्रॉलीमध्ये झोपलेल्या ज्ञान सिंह (वय ७८) यांच्या छातीत अचानक दुखायला लागले होते. यानंतर त्यांना आंदोलनात सहभागी असलेल्या रुग्णवाहिकेतून पंजाबच्या राजपुरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथून डॉक्टरांनी त्यांना पटियाला येथील राजेंद्र रुग्णालयात हलवले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ‘दिल्ली चलो’ मोर्चात सहभागी होण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी शंभू बॉर्डरवर आले होते.
Ambala, Haryana: Sub-Inspector Hiralal posted at the Shambhu Border due to the farmers’ movement, passes away. He was 52 years old. According to reports, Sub-Inspector Lal’s health suddenly deteriorated while on duty. He was immediately taken to Ambala Civil Hospital, but despite… pic.twitter.com/XMpxhzaGX2
— ANI (@ANI) February 17, 2024
पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…
Video: पोलिसकाकाला ट्रकचालकांची लाठ्या काठ्याने मारहाण…
Video: पोलिसकाकाच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावना नक्कीच ऐकण्यासारख्या….
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

