प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

मुंबई : ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात भूमिका साकरणारी अभिनेत्री शबरीन हिला प्रेमप्रकरणातून पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकराच्या भाच्याचे अपहरण प्रकरणात तिला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्री शबरीन हिचे ब्रिजेश नावाच्या युवकासोबत प्रेम संबंध होते. तिला ब्रिजेशसोबत लग्न करायचे होते. पण ब्रिजेशचे राजपूत कुटुंब मुस्लिम मुलीशी लग्न करायला तयार नव्हते. शबरीनने खूप प्रयत्न केले. पण, ब्रिजेशचे कुटुंब तयार होत नव्हते.

शबरीन हिने ब्रिजेशचा अडीच वर्षांचा भाचा प्रिन्स याचे पुण्यातून अपहरण केले. दुपारपर्यंत प्रिन्स घरी आला नाही म्हणून घरातले काळजी करत होते. चौकशी केल्यानंतर एक महिला त्याला घेऊन गेल्याचे समजले. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही तपासल्यावर शबरीन प्रिन्सला रिक्षामध्ये घेऊन जाताना दिसली. तिच्यासोबत आणखी एक महिला होती. रिक्षावाल्याची चौकशी करून पोलिस शबरीनपर्यंत पोहोचले. मोबाईल लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी शबरीनला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…

अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…

अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!