दाजी आणि मेहुणीच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली अन्…
पाटणा (बिहार): एक युवती दाजीच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती युवतीच्या भावाला समजल्यानंतर तिने दाजीसोबत मिळून आपल्याच सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
कांटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकुरांहा खरगी गावात ही घटना घडली आहे. कोमल सिंह हिचे तिचाच दाजी असलेल्या संजीव सिंह याच्यासोबत प्रेम संबंध होते. या संबंधाला कोमलचा भाऊ रितेशचा विरोध होता. सख्खी बहीण कोमल सिंह हिने अनैतिक संबंधासाठी आपलाच भाऊ असलेल्या रितेशची हत्या करण्याचे ठरवले. कोमलने दाजी संजीव आणि इतरांसह मिळून तिच्या भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोघांनीही रितेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मृताची पत्नी खुशबू हिला हा प्रकार कळताच तिने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मेहुणी कोमल सिंह हिला अटक केली. दाजी संजीव सिंह आणि इतर आरोपी अजूनही फरार आहेत. डीएसपी पश्चिम अभिषेक आनंद यांनी सांगितले की, ‘युवकाच्या खून प्रकरणात एकूण 6 आरोपी आहेत. ज्यामध्ये आरोपी दाजी संजीव सिंह आणि इतरांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथक छापेमारी करत आहेत.’
पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…
दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…
नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…
मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…
प्रेम! नवरदेवाचा बाप पडला नवरीच्या आईच्या प्रेमात अन्…