
पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…
अहमदाबाद (गुजरात): एका शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना चौकशीदरम्यान त्याच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, त्यावरून या शिक्षकाने अनेक विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी 12 व्हिडिओत तर हा शिक्षक स्वतः मुलींचं लैंगिक शोषण करताना दिसला आहे. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघड झाली आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
गुजरातमधल्या बडोद्यातील 17 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाबाबत अनेक नवीन बाबी उघड होत आहेत. या शिक्षकाने केवळ या विद्यार्थिनीसोबतच नव्हे, तर अनेक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर येत आहे. शिक्षकाच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, हे व्हिडिओ या शिक्षकाने चित्रित केले आहेत. जेव्हा तो मुलींवर बलात्कार करत तेव्हा तो त्या दुष्कृत्यांचा व्हिडिओ बनवत होता. शिक्षकाने हे व्हिडिओ डिलीट केले नव्हते. यापैकी काही व्हिडिओत तो स्वतःसुद्धा दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 45 व्हिडिओंपैकी 12 व्हिडिओमध्ये हा शिक्षक स्वतः विद्यार्थिनींशी गैरवर्तन करताना दिसत आहे. उर्वरित व्हिडिओंमध्ये फक्त पीडित मुली दिसत आहेत. या व्हिडिओंबाबत संबंधित शिक्षकाविरुद्ध पुन्हा वेगळा गुन्हा नोंदवला गेला. याबाबतची सुनावणी सध्या पॉक्सो न्यायालयात सुरू आहे.
पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला ‘I Love You’ चा मेसेज अन्…
शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…
शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…
मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…
गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…

