वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय…

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेवर बलात्कार करून नंतर तीची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलेचा मृतदेह गावाशेजारील जंगलामध्ये एका उंच टेकडीवर आढळून आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातील महिलेची (वय ४५) हत्या करण्यात आली आहे. आपल्या माहेरी राहणारी ही महिला दोन दिवसांपूर्वी शेतात गेली होती. मात्र, ती त्या दिवशी सायंकाळी घरी परतलीच नाही. तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह गावाशेजारील जंगलामध्ये एका उंच टेकडीवर आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृत महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय तिच्या भावाने तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…

Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…

भरदिवसा चौकात रस्त्याकडेलाच बलात्कार; Video Viral…

सोलापूर हादरलं! मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन अन् त्याच्या पत्नीवर बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!