अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी केला अत्याचार…
वाशिम : अल्पवयीन मुलीला घरात एकटं पाहून तिच्यावर शेजारील व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना राखीपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी डोंगरकिन्ही येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
डोंगरकीन्ही या गावात एक 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांबरोबर राहत होती. दुपारच्या वेळेस तिच्या कुटुंबातील सदस्य हे शेतामध्ये गेले होते. घरा शेजारी राहाणाऱ्या एका 42 वर्षीय व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच जर तिने घडलेल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. मुलीची आई शेतातून घरी आली तेव्हा तिने तिच्या मुलीला पाहिले. पीडित मुलगी खूप घाबरलेली होती. आईला पाहताच क्षणी मुलीच्या अश्रूंचा बांध फुटला. तिला रडताना पाहून आई देखील चिंतेत पडली. तिने तात्काळ शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या आईने लगेचच पोलीस स्थानकात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली.
मालेगावच्या डोंगरकिन्ही पोलिसांनी आरोपी गजानन निंबाजी गवई (वय ४२) याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने दुसऱ्यांदा बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायदाच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राखीपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…
विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…
औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…