
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
पुणे: पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगुलानी विष खाऊन आत्महत्या घटना शुक्रवारी (ता. ११) उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे तीन वर्षापासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. आत्महत्या केलेल्या युवतीच्या बहिणीने पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी त्यांच्या 16 वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडले होते, मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी एका संशयित मुलाचा देखील तपास याप्रकरणात करायला सुरुवात केली. तो मुलगा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता. खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात दोन मृतदेह मिळून आल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी धाव घेत याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
मागील दोन-तीन वर्षापासून प्रेमसंबंधात असलेल्या प्रेमी युगलांनी त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध झाल्याने खडकवासला बँक वॉटर परिसरात येऊन विष खाऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
वानवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीचा शोध घेण्यासाठी त्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क केला. संतोष कळसाईत यालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाइल बंद लागला. त्याच्या मूळ गावीही पोलिसांनी संपर्क केला. त्याचा मोबाइल सायंकाळी साडेपाचपासून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सकाळपासून पोलिस निरीक्षक लोंढे आणि अंमलदार महादेवनगर परिसरात त्या दोघांचा शोध घेत होते. दरम्यान, उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना दोन तरुण मुलामुलींचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी ही माहिती तातडीने वानवडी पोलिसांना दिली. त्यावेळी या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली. या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याने व त्याला घरातून विरोध झाल्याने त्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला परिसरात येऊन विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खडकवासला जंगलात या प्रेमीयुगुलाने विष घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरीही मुलाच्या मृतदेह पाहिल्यावर त्याची जीभ बाहेर आलेली होती. त्यामुळे विष घेतल्यावर जीभ बाहेर येते का, ही आत्महत्या आहे की घातपात आहे, अशी चर्चा सुरू होती. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…
पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…
प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…
पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

