जिद्दीने खाकी वर्दीचं केलं स्वप्न पूर्ण अन् महिला पोलिसाने घेतला गळफास…

पुणे : एका महिला पोलिसानं पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बारामती तालुक्यातील करंजे येथील संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले यांचे सुपे हे सासर तर करंजे हे माहेर होते. सध्या त्या डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात पती किरण भानूदास भोसले याच्यासोबत राहत होत्या. लहान वयात लग्न होऊनही संगीता यांनी हार न मानता जिद्दीने अभ्यास केला आणि पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

संसारात सर्व काही सुरळीत सुरू असतानाच पती किरण भानूदास भोसले याने संगीता यांचा छळ सुरू केला. गेल्या काही दिवसांपासून पतीकडून वारंवार होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास असह्य झाल्याने, अखेर संगीता यांनी डोंबिवलीतील राहत्या घरी गळफास लावून घेतला.

दरम्यान, या धक्कादायक घटनेप्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी पती किरण भानूदास भोसले याला तात्काळ अटक केली आहे. विष्णूनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पतीला पत्नी सावळी असल्याचे आवडत नसल्याने तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि त्यातून मारहाण केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे . तसेच घरातील वस्तूंच्या खरेदीवरून ‘जास्त पैसे का खर्च केले?’ या कारणावरूनही दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलीस तक्रारीत काय म्हटलं आहे?
सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संगीताने बेडरूममध्ये स्वतःला बंद करून घेत सिलिंग फॅनला ब्लँकेटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या आत्महत्येस पतीने प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी करंजे येथील सुलोचना राजेंद्र काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

संगीताच्या सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागणीसह तिचा सातत्याने छळ करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणात सासरच्या इतर मंडळींवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाइकांनी संगीताचे पार्थिव वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या परिसरात आणले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते आणि फौजदार राहुल साबळे यांनी नातेवाईकांची समजूत काढली. डोंबिवली पोलिसांकडून पुरवणी जबाब घेऊन इतर आरोपींविरोधातही चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संगीताच्या पार्थिवावर सोमेश्वर मंदिराजवळील शेतात विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.

पारधी समाजातील मुलींसाठी ठरली होती प्रेरणास्थान…
संगीताने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करत पोलीस दलात भरती होण्यात यश मिळवले होते. तिच्या यशानंतर पारधी समाजातील मुला-मुलींमध्ये शिक्षण आणि सरकारी नोकरीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. परिसरातील अनेक मुलींनी तिला आदर्श मानून पोलीस दलात प्रवेश केला होता.

पती किरण भोसले यालाही पोलीस दलात भरती होण्यासाठी संगीताने मार्गदर्शन केले होते. त्यानंतर तोही ठाणे पोलीस दलात कार्यरत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. स्वतःच्या संघर्षातून समाजातील तरुणींसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या संगीताचा कौटुंबिक छळामुळे मृत्यू झाल्याने करंजे, सुपे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिस उपनिरीक्षकाने खाकी वर्दीतच धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी…

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!