बीड मध्ये पोलिस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड…

बीड : पोलिस भरतीसाठी आलेल्या एक उमेदवाराने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बीडमध्ये 170 जागांसाठी भरती प्रकिया होत आहे. यासाठी 8400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बीडमध्ये पोलिस भरतीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून उमेदवारांची कसून तपासणी सुरु आहे. मांडवजाळीचा सुनील बहिरवाळ (वय 24) हा युवक मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेऊन आला होता. पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली. यावेळी त्याच्या बॅगमध्येही उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन पोलिसांना आढळून आले. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन काही उमेदवार वापरताना दिसतात.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

दरम्यान, महाराष्ट्रात 19 जून ते 28 जून अशी एकूण 10 दिवस पोलिस भरती प्रक्रिया चालणार आहे. सर्व भरती प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीत होत आहे. विशेष म्हणजे निकाल तात्काळ जाग्यावराच सांगितले जाणार आहेत.

पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी…

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…

महाराष्ट्र पोलिस दलात भरती होणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती…

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…

महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!