
नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…
छत्रपती संभाजीनगर : नवरा-बायकोचे विवाहबाह्य संबंध सुरू होते. नवरा प्रेयसीसोबत तर बायको प्रियकरासोबत पळून गेली. पण, यामुळे तीन मुली उघड्यावर पडल्या आहेत. सुरवातीला तीन महिने शेजाऱ्यांकडून या मुलांचे पालनपोषण करण्यात आले, मात्र आई-वडील काही परतलेच नसल्याने प्रकरण आता थेट पोलिसांत पोहचले आहे.
एक सात वर्षीय, नऊ वर्षीय आणि अकरा वर्षीय अशा तीन मुलींना घरात सोडून वडील प्रेयसीसोबत तर आई प्रियकरासोबत पसार झाली आहे. आईने दुसरे लग्न केले, बापही घरातून निघून गेला. धक्कादायक म्हणजे या घटनेला तीन महिले उलटले असून, दोघांपैकी एकही जण घरी न परतल्याने मुले उघड्यावर आली आहेत. सुरवातीला तीन महिने शेजाऱ्यांकडून या मुलांचे पालनपोषण करण्यात आले, मात्र आई-वडील काही परतलेच नसल्याने प्रकरण आता थेट पोलिसांत पोहचले आहे.
नवरा-बायकोचे विवाहबाह्य संबंध सुरू होते. त्यामुळे त्यांचे मुलींकडे लक्ष नव्हते. पुढे काही दिवसांनी दोघेही घर सोडून निघून गेले. आई प्रियकरासोबत निघून गेल्याने, वडील देखील आपल्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी कुठेतरी निघून गेला. मागील अडीच महिन्यांपासून आई-वडिलांच्या प्रतीक्षेत मुली रडत आहेत.
शेजाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर ते मदतीला धावून आले. शेजाऱ्यांनी चिमुकल्यांना दोन वेळेचे जेवण दिले. मात्र, हे किती दिवस चालणार म्हणून शेजारच्यांनी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. गेल्या तीन महिन्यांपासून तीन मुली घरात एकटयाच राहात असल्याचे माहिती दिली. यावर सातारा पोलिसांनी खात्री करून हे प्रकरण बाल कल्याण समितीसमोर ठेवले. बाल कल्याण समितीने तातडीने निर्णय घेत तिन्ही मुलींना छावणीतील विध्यादिप बालगृहात पाठविले. या प्रकरणी आई वडिलांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे…
पुण्यातील व्यावसायिकाची प्रेम प्रकरणातून गुवाहाटीत हत्या…
प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…
हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…
एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

