
भाजीत केस निघाला अन् नवऱ्याने जनावरासारखं मारलं; जीवन संपवले…
छत्रपती संभाजीनगर : भाजीत केस निघाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. सासरच्या छळाला कंटाळून ईश्वरी बनकर (वय २५) हिने टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवले आहे. पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सात जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
ईश्वरीचा २८ जून २०२० रोजी छत्रपती संभाजीनगरमधील अजय अशोक बनकर याच्यासोबत विवाह झाला. ईश्वरीच्या वडीलांनी मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले होते. तरीही अजय माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत होता. त्याने विकत घेतलेल्या प्लॉटचे हप्तेही तिच्या वडिलांनाच भरण्याची मागणी करीत होता. तो रोज दारू पिऊन घरी यायचा, त्यानंतर तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करायचा. सासरकडील अन्य नातेवाईकही सातत्याने घरी येऊन त्रास देत असे. ईश्वरीने ही बाब आई-वडिलांना सांगितली. त्यांनी दोघांची समजूत काढून एकत्र राहण्याचा सल्ला दिला. मात्र, पतीच्या वागण्यात सुधारणा होत नव्हती.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पती अजयसह सासरच्यांच्या छळाला कंटाळून ईश्वरीने यापूर्वी देखील जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी एकत्रित बसून चर्चा करून वाद मिटवून तिला पुन्हा सासरी पाठवले. ६ एप्रिलला रात्री ११ वाजता जेवणात केस निघाल्याच्या कारणावरून अजयने तिला मारहाण केली. ईश्वरीने रात्रभर होत असलेला त्रास सहन केला. ७ एप्रिलला त्याने पुन्हा मारहाण करीत गंभीर आरोप केले. त्याचा सततचा त्रास असह्य झाल्याने अखेर ईश्वरीने मंगळवारी गळ्याला दोर लावत जीवन संपवले.
ईश्वरीचा पती अजय बनकर (वय ३०, रा. श्रावस्ती कॉलनी) याच्यासह दिनेश दिलीप बनकर, दिलीप दशरथ बनकर, चंद्रमणी दशरथ बनकर, छाया चंद्रमणी बनकर, आशिष चंद्रमणी बनकर, गणेश दिलीप बनकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. अजय हा मनपाच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान आहे. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस बेपत्ता मुलीचा शोध घेऊन पुण्याहून आले अन् घेतला गळफास…
IPS तेजस्वी सातपुते यांनी मांडली अशोक खरात याची ‘कुंडली’…
महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार…
नांदेड! गँगवारमध्ये पाच जणांचा मृत्यू; पोलिसांनी नेम धरून झाडली गोळी…
पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

