
धक्कादायक! दारूडा नवरा मध्यरात्री उठला अन् नको ते करून बसला…
नाशिक : रिक्षाचालक असणाऱ्या दारुड्या नवऱ्याने मध्यरात्री रात्री झोपलेल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि स्वतःही साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबडजवळील चुंचाळे परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
चेतन नाना माडकर (वय 33) आणि स्वाती चेतन माडकर (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक असणाऱ्या चेतनला दारूचे व्यसन होते. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. सततच्या भांडणाला कंटाळून पत्नी मुलांना घेऊन आईच्या घरी राहण्यास आली. अधूनमधून चेतन मुलांना भेटण्यासाठी येत-जात होता.
सासूला वाटलं की, जावई आता सुधारला आहे. त्यामुळे तिने जावई आणि मुलीने पुन्हा संसार करावा, यासाठी चुंचाळे परिसरातच एक खोली भाड्याने घेऊन दिला. स्वाती एका खासजी कंपनीत काम करून तीन मुलांचा सांभाळ करत होती. सोमवारी रात्री त्या दोघांच्यात पुन्हा भांडण झाले. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना चेतनने ओढणीने पत्नीचा गळा आवळला, त्यात स्वातीचा मृत्यू झाला. त्यानंतर चेतनने स्वतःही आत्महत्या केली. या घटनेत दारूच्या व्यसनामुळे 3 मुलं अनाथ झाली आहेत. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन…
नाशिक हादरलं! विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन…
नाशिक! बहिणीला प्रपोज केल्याने युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून…
नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमधील विवाहित महिलेची आत्महत्या…
नाशिक! मित्राच्या मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर पॉर्न व्हिडीओ दाखवला अन्…

